Navratri 2024: नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण का केले जाते? जाणून घ्या...

Navratri 2024: नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण का केले जाते? जाणून घ्या...

गुरुवार ३ ऑक्टोबरला अश्विन शुक्ल प्रतिपदा, शारदीय नवरात्री सुरू होत आहे. अशातच नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाते हे पठण करण्यामागे काय कारण आहे जाणून घ्या...
Published by :
Team Lokshahi
Published on

गुरुवार ३ ऑक्टोबरला अश्विन शुक्ल प्रतिपदा, शारदीय नवरात्री सुरू होत आहे. सकाळी ६ वाजून ७ मिनिटे ते ९ वाजून ३० मिनिटापर्यंत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल. नवरात्री अवघ्या काही दिवससांवर येऊन ठेपली आहे अनेक मंडळामध्ये तयारी देखील सुरु झाली आहे. दुर्गेच्या महिमेवर अनेक कथा आपण ऐकूण असाल देवीने नऊ दिवस महिषासुरासोबत युद्ध करून अखेर दहाव्या दिवशी त्याच्या वध केला जो दिवस हिंदू धर्मात दसरा म्हणून ओळखला जातो. तर देवीला अनेक नावांनी ओळखले जाते महिषासुरमर्धिनी, दहिषासुरमर्धिनी, करवीरपुरवासिनी तसेच दुर्गा अशा अनेक नावात देवी दुर्गेची व्याप्ती आहे. अशातच नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाते हे पठण करण्यामागे काय कारण आहे जाणून घ्या...

​दुर्गा सप्तशती पठण का करावे:

नवरात्रातील दिवसांमध्ये दुर्गा सप्तशती पठण केल्यास देवाचा आशीर्वाद आणि देवीची कृपा आपल्यावर कायम राहते. हे सप्तशतीचे पठण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सप्तशती ग्रंथात लिहलेले आहे. दुर्गा सप्तशती पठणानंतर यथाशक्ती आणि यथासंभव दान करावे असे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. असे केल्याने प्रत्येक कठीण टप्प्यावर देवीचे शुभाशिर्वाद, कृपा, पाठिंबा मिळतो असे देखील सांगितले गेले आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथात देवीच्या चरित्राचे वर्णन केलेले आहे.

यामध्ये १३ अध्याय असून, तो तीन भागात विभागण्यात आला आहे. दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीची महती, देवीचा महिमा तसेच देवीचे महात्म्य आणि देवीच्या स्वरुपांविषयी वर्णन सांगण्यात आलेले आहे. दुर्गा सप्तशतीच्या १३ अध्यायांमधील पहिल्या भागात मधु कैटभ वधकथा सांगण्यात आलेले आहे तसेच दुसऱ्या भागात महिषासुर संहार आहे आणि तिसऱ्या भागात शुंभ-निशुंभ वध तसेच देवीकडून सुरथ आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानांविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण करणे महत्त्वाचे ठरते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com